Ticker

6/recent/ticker-posts

Salmon Fish in Marathi Information - सालमन माशाला मराठी मध्ये काय म्हणतात ? salmon fish name, benefits, recipe in marathi

 

salmon fish in marathi

salmon fish in marathi

सालमन माशाला मराठी मध्ये काय म्हणतात ? (Salmon Fish In Marathi)
Salmon माशाला मराठी मध्ये आपण रावस मासा असे म्हणतो, अतिशय चविष्ट असलेला हा मासा मुंबई व कोकणात फार खाल्ला जातो सध्या अनेक लोक रावस माशाच्या शेती व्यवसायात देखील उतरले आहेत, रावस मासा शरीरासाठी सुद्धा खूप उपयोगी असतो व अनेक रोगांपासून संरक्षण देतो, आपल्या आजच्या ह्या लेखामध्ये आपण रावस बद्दल सर्व माहिती घेऊयात. 


रावस माशाचे शरीराला फायदे (Health Benefits of Salmon fish In Marathi)

जितका चवीला तितकाच शरीराला पोषक असा हा मासा आहे खाली रावस माशाचे फायदे दिले आहेत.


रावस माशाची पौष्टिक माहिती (Nutritional Information of Salmon In Marathi)


प्रत्येक १०० ग्राम मध्ये
२३२ कॅलरी
२५ ग्राम प्रोटीन
१४.६ ग्राम फॅट
२.८ ग्राम अनसॅचुरेटेड फॅट


१.रावस मासा ओमेगा-३-फॅटी ऍसिड ने भरपूर (full of omega 3 fatty acid salmon fish in marathi)

रावस माशांमध्ये ओमेगा-३-फॅटी ऍसिड चे प्रमाण भरपूर असते. १०० ग्राम रावस माशामध्ये जवळपास ३ ग्राम ओमेगा-३-फॅटी ऍसिड आढळून येते.
ओमेगा-३-फॅटी ऍसिड हे शरीराला लागणारे खूप महत्वपूर्ण घटक आहे मेंदू , डोळे व स्किन साठी खूप लाभदायक असे ओमेगा-३-फॅटी ऍसिड आहे तसेच शरीराची सम्पूर्ण हेल्थ सुध्दा टिकऊन ठेवते.
हृदयविकार,सांधेदुखी कमी करण्यासाठी ओमेगा-३-फॅटी ऍसिड चा वापर केला जातो त्यामुळे रावस मासा खाणे अति आवश्यक आहे.


२.प्रोटिनयुक्त मासा रावस (best source of protein - salmon fish in marathi)

ओमेगा-३-फॅटी ऍसिड सारखाच अजून एक महत्वाचा घटक जो आपल्याला जेवणातून घ्यावा लागतो तो म्हणजे प्रोटीन, रावस मासा प्रोटीन ने भरपूर असतो १०० ग्राम माशामध्ये जवळपास 25 ग्राम प्रोटीन असते.


प्रोटीन शरीरातील अनेक कार्यासाठी आवश्यक असते, जशे एखादी इजा झाल्यावर तिला बरी करण्यासाठी, शरीरातील मास मसल्स मजबूत ठेवण्यासाठी व हाडांची निगा राखण्यासाठी असा प्रोटिनचा उपयोग होतो.


३.व्हिटामिन बी (great source of vitamin B - salmon fish in marathi)

ही जीवनसत्त्वे आपल्या शरीरातील बर्‍याच महत्वाच्या प्रक्रियेत सामील असतात, जशे की आपण खाल्लेले अन्न उर्जेमध्ये बदलणे व डीएनए तयार करणे आणि दुरुस्ती करणे अशी अनेक प्रक्रियेसाठी व्हिटामिन बी आवश्यक असते.


४.रक्तदाब कमी करते

रावस मासा ओमेगा-३-फॅटी ऍसिड ने भरपूर असल्याने हा मासा खाल्ल्याने कोलेस्टेरॉल सामान्य राहते. ओमेगा-३-फॅटी ऍसिड वाढलेलं रक्तदाब कमी करतात.


५.वजन कमी करण्यासाठी उपयोगी (weight loss tips of salmon fish in marathi)

रावस मासा प्रोटीन ने भरपूर असतो व त्यातील चरबीचे प्रमाण खूप कमी असते रावस ची चरबी सम्पूर्ण मशामध्ये सामावलेली असते त्यामुळे रावस खाल्ल्याने तुमच्या शरीराला पुरेसे जीवन आवश्यक तत्वे मिळतात व चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.


रावसचे इतर फायदे थोडक्यात (Benefits of Salmon Fish In Marathi)


१.स्मरणशक्ती वाढते 
२.शरीरातील दुखणे कमी करते
३.निरोगी त्वचा राखण्यासाठी उपयुक्त
४.ह्रदय विकारांवर मात करते

सालमन इतर भाषेत काय बोलतात (Salmon In Other Indian Languages)

१.हिंदी - रावस Salmon In Hindi - Ravas

२.मराठी - रावस Salmon fish In Marathi - Ravas

३.तेलगू - मगा Salmon In Telugu - Maga 
४.तमिळ - कीलांगण Salmon In Tamil - kilangaan
५.गुजराती - रमस Salmon In Gujarati - Ramas
६.मलयालम - कोरा/काला Salmon In Malayalam - Kora/Kala

रावस माशाचा भाव काय असतो ? (Salmon Rate In Maharashtra)

रावस मासा किलोच्या प्रतीने ५०० रुपये ते ८०० रुपये च्या भावाने मार्केट मध्ये विकला जातो.

रावस फ्राय रेसिपी (Recipe of salmon fish in marathi)


salmon fish in marathi



मेरीनेशन साहित्य 


१ किलो रावस बारीक कापलेला
२ चमचे आलं लसूण पेस्ट
२ चमचे लाल तिखट
१ चमचा हळद
मीठ चवीनुसार
२ चमचा चिंचेचे पाणी किंवा कोकम

 

वरील दिलेलं सर्व रावस माशाला लावून मेरीनेट करावे कमीत कमी १० मिनिटे हे मिश्रण लावून बाजूला ठेवावे

फ्राय करण्यासाठी साहीत्य

पाव किलो तांदळाचे पीठ
पाव किलो रवा
२ चमचे लाल मिरची पावडर
१ चमचा हळद
थोढीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मीठ

 

वरील दिलेलं सर्व साहित्य मिक्स करा व त्यात मेरीनेट केलेला रावस माशाची तुकडी घालून तिला पूर्ण पिठामध्ये कव्हर करून घ्या व तशीच कव्हर केलेली रावसची तुकडी गरम तेलामध्ये फ्राय करा ,
साधारण पाच ते सहा मिनिटांत ही रेसिपी बनून तयार होते.


तर मित्रांनो हा salmon fish in marathi लेख जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून कळवा व रावस माशा बद्दल तुम्हाला अजून काही माहीत असेल तरीही तुम्ही कमेंट करू शकता व तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तरीही आम्हाला कळवा,धन्यवाद




आपले इतर लेख वाचा

Post a Comment

0 Comments