उन्हाळी लागणे उपाय नैसर्गिक व आयुर्वेदिक घरगुती उपाय | लघवीच्या जागी जळजळ होणे घरगुती रामबाण उपाय | mayboli.in - मायबोली

Sunday, June 21, 2020

उन्हाळी लागणे उपाय नैसर्गिक व आयुर्वेदिक घरगुती उपाय | लघवीच्या जागी जळजळ होणे घरगुती रामबाण उपाय | mayboli.in

तर मित्रानो आज आपण समजून घेणार आहोत कि उन्हाळे लागणे म्हणजे काय व उन्हाळी लागणे उपाय नैसर्गिक व आयुर्वेदिक घरगुती उपाय.

Image Source: huffingtonpost.ca

उन्हाळी लागणे यालाच इंग्रजीमध्ये डायसुरिया (Dysuria) असे म्हणतात.
उन्हाळी लागण्याची लक्षणे लघवी करताना जळजळ, आग किंवा अस्वस्थता वाटते, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हे अधिक सामान्य आहे.  पुरुषांमध्ये, हे तरुण पुरुषांपेक्षा वयस्क पुरुषांमध्ये अधिक सामान्य आहे.

उन्हाळी लागण्याची कारणे

१. बॅक्टरीयल संक्रमण

मूत्रमार्गाचा संसर्ग (युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन) हे एक प्रमुख कारण आहे उन्हाळी लागण्यासाठी.
बॅक्टरीया मूत्रपिंडातुन (Uterus) मूत्रमार्गात जातो, मूत्रमार्गात बॅक्टेरिया कुठेही संक्रमण करतो व त्यामुळे झालेल्या संक्रमनापासून जळजळ, आग किंवा अस्वस्थता निर्माण होते.

मूत्रमार्गात संसर्ग झालेल्या व्यक्तींना खलील लक्षणे देखील जाणवतात

१. सतत लघवी झाल्यासारखे वाटते
२. रक्ताची लघवी होणे
३. अंग गरम होणे (ताप)
४. अंगदुखी


२.लैंगिक संक्रमित संक्रमण (सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिस)

लैंगिक संबंधातून झालेल्या बॅक्टरीयल संक्रमनापासून सुद्धा उन्हाळी लागल्याचे जाणवून येते.
अनेकदा क्लमेडिया, गणोरिया, व हर्प्स पासून हे सगळ्यात जास्त लैंगिक संक्रमित संक्रमण करणारे बॅक्टरीया आहेत.

३.मुतखडा असणे

मुतखडा सुद्धा एक प्रमुख कारण आहे उन्हाळी लागण्यासाठी,
मुतखडा किंवा किडनी स्टोनमध्ये किडनीमध्ये लहान खडे तयार होतात, किडनी शरीरातील पाणी स्वच्छ करून त्यातील घाण लघवी मार्फत बाहेर काढते, मुतखडा झाल्याने लघवी करताना प्रचंड त्रास होतो.

४.डिम्बग्रंथि अल्सर (ओव्हरीयन सिस्ट)

स्त्रियांच्या दोन्ही अंडाशयात (ब्लॅडर) बॅक्टरीयल संक्रमनामुळे  गाठी निर्माण होतात ह्या रोगाला डिम्बग्रंथि अल्सर व इंग्रजीमध्ये ओव्हरीयन सिस्ट असे म्हणतात.

डिम्बग्रंथि अल्सरमुले होणारे त्रास

१. योनीतून अधिक किंवा असामान्य रक्तस्त्राव
२. पोटाच्या खलील भागात वेदना
३. मासिक पाळीमध्ये प्रचंड वेदना

५.व्हल्व्होवाजिनिटिस 

योनीच्या आतील त्वचेमध्ये संसर्गजन्य किंवा नॉन-संसर्गजन्य 
बॅक्टरीया पासून जळजळ किंवा आग होते व योनिमार्गात स्राव, चिडचिड, प्रुरिटस आणि एरिथेमा  अशी इतरही लक्षणे जाणवुन येतात.
व्हल्व्होवाजिनिटिस स्त्रियांमध्ये उन्हाळी लागणेसाठी कारणीभूत आहे.

उन्हाळी लागणे उपाय 

जस की आपण वरील लेखामध्ये वाचले असाल व तुम्हाला समजले देखील असेल की उन्हाळी अनेक कारणापासून लागतात, त्याप्रमाणे त्याचे उपाययोजना देखील वेगवेगळ्या असतात, आशा वेगवेगळ्या उपाययोजना खाली दर्शवल्या आहेत.

१. सिस्टिटिसमुळे उन्हाळी लागणे उपाय

दररोज अनेक ग्लास पाणी पिणे व सतत लघवी करणे ह्यामुळे मूत्रमार्गात असलेले जिवाणू बाहेर काढले जातात. तसेच स्त्रियांनी लैगिक संबंध केल्यावर लगेच लघवी करून व योनी चा भाग स्वच्छ पाण्यानी धुवून काढावा ज्याने जिवाणूंचा संसर्ग कमी होईल.

२. प्रोबायोटिक्सच सेवन : एक रामबाण उन्हाळी लागणे वर उपाय

फायदेशीर बॅक्टेरियांना प्रोबायोटिक्स असे म्हणतात, प्रोबायोटिक्स मूत्रमार्गाला आरोग्यदायी ठेवतात व तसेच हानिकारक बॅक्टेरियांपासून मुक्त राहण्यास मदत करतात.

प्रोबायोटिक्स कसे काम करतात

१. हानिकारक जीवाणूंना मूत्रमार्गात जाण्यापासून प्रतिबंधित करते.
२. मूत्रामध्ये हायड्रोजन पेरोक्साइड तयार करतात एक मजबूत प्रतिजैविक आहे (अँटीबॅक्टरीयल)
३.मूत्राचा पीएच कमी करतात, कमी पीएच जीवाणु साठी प्रतिकूल नसते

प्रोबायोटिक्स असलेले खाद्य

१.दही
२.पनीर
३.इडली व डोसा
४.लोणचे


उन्हाळी लागणे उपाय घरगुती व आयुर्वेदिक

१. तुलसीच्या पानाचा काढा


१०-१५ ताजी तुळशीची पाने १ कप पाण्यात उकळून घ्यावीत, थंड झाल्यावर हे पाणी गाळून त्यात १-२ चमचे मध घालून दिवसातून २-३ वेळा घेतल्यावर उन्हाळी लागल्यावर होणाऱ्या जळजळ पासून आराम भेटतो

२. दुर्व्याच्या रस


१-२ चमचे दुर्व्याच्या पानाचा रस घेऊन त्यात 1 ग्लास दूध घालून  दररोज किमान २ वेळा प्यावे.

३.कोरफड रस


दुधामध्ये कोरफडीचा रस व मध घालून नियमित पिल्याने उन्हाळे लागण्याचे प्रमाण कमी होते.

४.काकडीउन्हाळे लागल्यावर जळजळ व आग कमी करण्यासाठी काकडी अतिशय उपयोगी आहे, तसेच काकडी अंगातील गर्मी सुद्धा कमी करते.

१ कप काकडीचा रसामध्ये १ चमचा मध व लिंबाचा रस घालून घेणे तुम्ही मीठ व काळी मिरी पावडर सुद्धा घालू शकता.
दिवसातून २ ग्लास घेणे.

५. दूध


१ ग्लास दुधामध्ये चिमूटभर काली मिरी पावडर व हळद घालून घेणे व त्यात चिमूटभर जिरा घालून दर ३-४ तासाने पिणे
२ दिवसांत आराम पडेल.

६.इलायची


अर्धा चमचा इलायची पूड १ ग्लास दुधात घालून घ्यावी, दूध सोमत गरम ठेवणे.
दिवसातून २-३ वेळा हे मिश्रण पीने.

७.गोरक्ष काढा


१ चमचा गोखरू झाडाची पूड १ ग्लास दुधात घालून त्यात १ चमचा मध घालून दिवसातून २-३ वेळा घेणे.

८. आल्याचा रस


१ चमचा आल्याचा रस दुधात किंवा पाण्यात घालून घेणे व त्यात १ चमचा मध घालून दिवसातून २-३ वेला प्यायल्याने लघवी करताना होणारी जळजळ लवकर कमी होते.

डॉक्टरांकडे केव्हा जावे ?

जर उन्हाळे लागल्यावर घरगुती उपाय करूनसुद्धा तुम्हाला होणारी जळजळ कमी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक फायदेशीर ठरेल.

No comments:

Post a comment