gulvel plant benefits in marathi गुळवेल: एक औषधी वनस्पती अनेक उपयोग - मायबोली

Tuesday, June 30, 2020

gulvel plant benefits in marathi गुळवेल: एक औषधी वनस्पती अनेक उपयोग


21 व्या शतकात आयुर्वेदिक औषधी वनस्पती  आपलं साम्राज्य निर्माण करताना दिसत आहेत त्याच मुख्य कारण म्हणजे आयुर्वेदिक वनस्पती सोबत कुठलेही दुष्परिणाम तुम्हाला आढळून येत नाहीत जे केमिकल्स ने बनवलेल्या औषधामध्ये आढळून येतात, आपण अशाच  एका औषधी वनस्पती  गुळवेल बाबत आज आपण वाचणार आहोत.

कव्हर केलेले मुद्दे 

  • गुळवेल म्हणजे काय (gulvel or giloy plant in marathi)
  • गुळवेल चे फायदे (gulvel plant benefits in marathi)
  • गुळवेलचे आर्युवेदामध्ये सांगितलेले उपयोग (giloy plant in ayurveda)
  • गुळवेल काढा कसा बनवायचा (How to make giloy kadha/juice)
  • गुळवेल सत्व कसे बनवायचे (Preparation of Gulvel Satva In Marathi)


गुळवेल म्हणजे काय (gulvel or giloy plant in marathi)

गुळवेल चे साइंटिफिक नाव आहे टिनोस्पोरा कॉर्डिफोलिआ (Tinospora Cordifolia),संस्कृत मध्ये गुळवेल ला गुडूची असे म्हणतात, गुळवेल मुख्यता भारतीय उपखंडात सापडणारी औषधी वनस्पती आहे. गुळवेल ला हिंदी मध्ये गिलोय असे म्हणतात हिंदू पुराणानुसार ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की अशी वस्तू जी अमृतासारखी आहे व जीवित वस्तुंना वृद्धाअवस्थेतून तरुण बनवते.

गुळवेल चे महत्व (Benefits Of Gulvel in Marathi)1

१. मधुमेह विरोधी
गुलवेल झाडाचे खोड मधुमेह मध्ये वाढलेल्या साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी केला जातो, गुळवेल ऑक्सिडीटीव्ही ताण कमी करून शरीरातील इन्सुलिन वाढवते व शरीरात बनणाऱ्या साखरेचे प्रमाण कमी करते.

२. विषाक्त-विरोधी प्रभाव (Anti-toxic effects)
गुळवेल शरीरातील थिओबार्बीचुरिक ऍसिड रिएक्टिव पदार्थाची  (टीबीएआरएस) पातळी कमी करून संरक्षणात्मक परिणाम दाखवते.

3. संधिवात व अस्थीरोगात गुणकारी
गुळवेल व आलं संधीवतामध्ये अत्यंत गुणकारी आहे व वर्षानुवर्षे गुळवेलला संधीवतामध्ये वापरले जात आहे.
गुळवेल हाडांमध्ये ऑस्टिओब्लास्ट वाढवते ज्यामुळे बोन मॅट्रिक्समध्ये जास्तीत जास्त खनिज जमा होऊन अस्थीरोगात ढिसुळ झालेली हाडे भरीव होतात.

४. कर्करोगविरोधी प्रभाव
गुळवेल कर्करोगाविरोधी असलेला प्रभावावर जगभर रीसर्च चालू आहे व बऱ्याच संशोधकांनी गुळवेल चा कर्करोग विरोधी प्रभाव मान्य सुद्धा केला आहे.
गुळवेल शरीरातील टीशूंचे वजन वाढवते तसेच कर्करोगामुळे नष्ट व परिणाम झालेल्या शरीरातील टिशुंचे पुनर्निर्माण करते.

५.जंतुनाशक (अँटी मायक्रोबियल) (Anti - Microbial)
गुळवेल अनेक किटाणू विरोधात गुणकारी आहे, अनेक हानिकारक किटाणू श्वसन मार्गातून शरीरात जातात व भयानक रोग उत्पादन करतात,गुळवेल श्वसण मार्गात होणाऱ्या सर्व आजारांवर अतिशय परिणामकारी आहे.

६. अँटी ऑक्सिडन्ट (Anti-Oxidant)
शरीरातील पेशी आपल्याला ह्रदयविकार, कर्करोग व इत्यादी प्राणघातक रोगांमध्ये सुरक्षा देण्याचे काम करतात,
गुळवेल अँटी ऑक्सिडन्ट असल्याकारणाने ते शरिरातील पेशींची हानीकारक रॅडिकल्स पासून सुरक्षा करते.

७. त्वचारोगांवर रामबाण ( giloy benefits for skin)
गुळवेलमध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात जे त्वचा उजलायला व त्वचेवरचे काळे डाग, पिंपल्स, मुरूम, वयामुळे पडलेल्या चेहऱ्यांवरील सुरकुत्या कमी करून आपल्या तरुन वयात असलेली ताजी तवान त्वचा परत देते.

८. गुळवेलचे केसांवरील लाभदायक परिणाम (giloy benefits for hair)
गुळवेल मध्ये अँटीऑक्सिडन्ट गुणधर्म असतो जो केसांच्या टिशुंचे संरक्षण करून केस मजबूत होण्यासाठी मदत करतो तसेच गुळवेल काढ्याचे रोज सेवन केल्याने केसांची वाढ होते व केस गलायची कमी होतात

गुळवेलचे आर्युवेदामध्ये सांगितलेले उपयोग (gulvel plant benefits in marathi)

आयुर्वेदा मध्ये गुलवेल चा उपयोग ताप,कावीळ,जुलाब,अतिसार,कर्करोग, जंतुनाशक, हाडांचे फ्रॅक्चर, अस्थीरोग, संधिवात, दमा, त्वचेचे रोग, दमा, सर्पदंश इत्यादी रोगांमध्ये केला जातो.

अनेक भाषांमध्ये गुळवेल ला काय म्हणतात ( Giloy meaning in many language)2

  • संस्कृत- गुडूची, अमृत, अमृतावली, मधूपर्णी, गुडुचिका, तंत्रिका, कुंडलिनी, चक्रालक्षणिक
  • मराठी- गुळवेल
  • बंगाली- गुलंचा 
  • हिंदी- गिलोय, गुर्चा
  • गुजराती- गारो, गलक
  • तेलुगू- ठिप्पाटीगा
  • कन्नड- अमृतावली
  • कश्मिरी- अमृत, गिलो
  • मल्लू- चिथामृतू
  • तमिळ- सिंडल, सिंडल कोडी
  • इंग्रजी- मूनसिड, टिनोस्पोरा

गुळवेल काढा कसा बनवायचा

गुळवेल व कडुलिंबाची काढा












साहित्य
१ इंच आले
६-७ कडुलिंबाची पाने
७-८ तुळशीची पाने
५ लवंग
६ काळीमिरी
२ लहान गुळवेल च्या फांद्या

 कृती
१. सर्वप्रथम गुलवेल च्या फांद्या सोलुन बारीक करून घेणे
२.सर्व साहित्य एकत्रित करून त्यांना मिक्सर मध्ये बारीक करणे
३.वरील तयार केलेली पेस्ट गरम तव्यावर घालून त्यात दोन ग्लास पाणी घालून उकडून घ्यावी, साधारन अर्धे पाणी कमी झाल्यावर काढा गाळून घ्यावा
४.रोज नियमितपणे काढ्याचे सेवन केल्याने अनेक आजार होण्यापूर्वीच नष्ट होतात.

गुळवेल व हळदीचा काढा











साहित्य
२ लहान गुळवेल च्या फांद्या
२ कप पाणी
१ इंच हळदी
२ इंच आले
७-८ तुळशीची पाने

कृती
१. सर्व साहित्य एक खोलगट तव्यावर घ्यावीत व मंद आचेवर त्यांना उकळून घ्यावीत
२. उकळून अर्धा काढा कमी झाल्यावर थंड करून गाळून घ्यावा 
३. हळद व आले असल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व अनेक श्वसण रोगांपासून आराम मिळतो.

गुळवेल सत्व कसे बनवायचे (Preparation of Gulvel Satva In Marathi)












साहित्य
४-५ गुळवेलच्या फांद्या
२०० मिली पाणी
१. सर्वप्रथम गुळवेलच्या फांद्या धुवून व सोलून घ्या
२. फांद्या बारीक क्रश करून पाण्यात भिजत घालाव्यात
३. १-२ तासांनी पाण्यामध्ये स्टार्च तयार होते व पाण्याच्या बुडाला जाऊन जमते
४. स्टार्च न हलवता पाणी काडून घेणे
५. उरलेले स्टार्च सुखऊन घ्यावे व तुमचे गुळवेल सत्व तयार आहे.

उन्हाळी लागणे उपाय
रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी
अडुळसा औषधी वनस्पतीचे लाभदायक फायदे


No comments:

Post a comment