चिया सिड्स मराठी मध्ये Chia seeds in marathi & its benefits - मायबोली

Wednesday, June 24, 2020

चिया सिड्स मराठी मध्ये Chia seeds in marathi & its benefits


बाजारामध्ये तुम्ही Chia Seeds पाहिल्या असाल व तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, कारण काही दिवसांपूर्वी मलाही हा प्रश्न पडला होता. मी इंटरनेट वर खूप आर्टिकल वाचले पण काही योग्य उत्तर भेटले नाही म्हणून हा आर्टिकल लिहायचे मी ठरवले.
ह्या आर्टिकल मध्ये मी Chia Seeds चिया बीज बद्दल पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचे असल्यास कॉमेंट करून विचारावे.

१. चिया बियांना मराठीत काय म्हणतात (Chia seeds in marathi)

उत्तर: Chia Seeds (चिया बीज) हे मूळचे अमेरिकन (मेक्सिकन) आहे, हे भारतात आढळत नाही, जागतिकीकरणामुळे हे भारतीय बाजारात आले आहे.
हे मूळचे भारतीय नसल्याने Chia Seeds (चिया बीज)  ला मराठी नाव नाही आहे, अशा वेळी चिया सिड्स किंवा चिया बियाणे असे म्हणणे उचित राहील.

२. Chia Seeds (चिया बीज) म्हणजे सब्जा का?

उत्तर : नाही
अनेक लोकांना हेच वाटते की चिया बीज म्हणजेच सब्जा, पण तसं नाही सब्जा व चिया बीज मध्ये खूप फरक आहे व दोन्ही वेगळ्या बिया आहेत. दोन्ही बिया आहेत एवढंच साम्य ह्या दोन्ही बियांमध्ये आहे, 
सब्जा हा जास्त काळसर असतो व चिया बीज (Chia Seeds) राखाडी ते काळसर रंगाच्या असतात.

३.Chia Seeds (चिया बीज ) मधील पौष्टिक तत्वे

उत्तर: दोन्ही बिया पौष्टिक तत्वाने भरलेली असतात पण त्यातही Chia Seeds (चिया बीज) मध्ये सब्जाच्या तुलनेत जास्त पौष्टिक तत्वे असतात.
१. प्रथिने (Protein) आणि ओमेगा 3 एस चा चांगला स्रोत
प्रथिने शरीरातील स्नायुंची वाढ करण्यास मदत करते व ओमेगा 3 ह्रदयविकारात मदत करते

२. फायबरयुक्त बियाणे अशीही Chia Seeds ची ओळख आहे जे अन्न पचन करण्यास मदत करते

३. कमी कार्बोहायड्रेट असल्याने Chia Seeds वजन कमी करण्यास मदत करते


चिया सिड्स व सब्जा मधला फरक


१. मूळ
चिया बीज (Chia Seeds) मूळच्या अमेरिकन मेक्सिकन बिया आहेत व इथेच जास्त प्रमाणात आढळतात.

सब्जा : मूळच्या भारतीय बिया असून सर्व भारतात जास्त प्रमाणात आढळतात

२. रंग
चिया बीज (Chia Seeds) : पांढरा राखाडी ते काळ्या रंगांच्या मिक्स बिया असतात

सब्जा : गडद काळ्या रंगाच्या बिया असतात

३. स्वरूप/आकार
चिया बीज: अंडाकृती आकाराच्या बिया

सब्जा : भाताच्या लहान धान्यांप्रमाणे लंबवर्तुळ बिया

४. पाण्यात भिजवल्यावर काय होते
चिया बीज : चिया बियांना पाणी शोषण्यास वेळ लागतो. चिया बिया आपल्या वजनापेक्षा १० पट पाणी शोसून घेण्याची क्षमता ठेवतात.

सब्जा : पाण्यात मिसळल्यावर काही सेकंदात सबजा फुगतो व  बियाभोवती अर्धपारदर्शक कोट  तयार होतो आणि भिजलेल्या चिया बियाण्याशी तुलना करता तो आकारात खूप मोठा दिसतो

५. चव
चिया बीज : स्वतःची चव नसते पण कोणत्याही प्रकारच्या डिशमध्ये सहजपणे समाविष्ट करता येते.

सब्जा : सौम्य तुळशीच्या पानांची चव असते व कुठल्याही पेया मध्ये सहजपणे मिसळता येते

तर मित्रांनो व मैत्रिणींनो मला खात्री आहे की तुम्हाला आता कळले असावे की चिया सिड्स ला मराठीमध्ये चिया सिड्स असेच म्हणतात व चिया सिड्स आणि सब्जा मधला फरकसुद्धा कळला असेल.
आपला पुढील ब्लॉग असेल चिया सिड्स चे फायदे व चिया सिड्स च्या रेसिपी.
ब्लॉग वाचल्याबद्दल धन्यवाद.

No comments:

Post a comment